नाशिकमध्ये खासदार, आमदारांच्या पक्षांतरानंतरही संघटनात्मक पातळीवर एकसंघ राहिलेल्या महानगर शिवसेनेला (ठाकरे गट) सुरुंग लावण्यात अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला यश आले आहे. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा निवासस्थानी नाशिक महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह ११ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला. लवकरच आणखी माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा बोरस्ते यांनी केला आहे.

हेही वाचा- ‘सुरेशदादांनी मैदानात उतरावं हीच अपेक्षा’; गुलाबराव पाटील

पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

ठाकरे गटातील संभाव्य फूट रोखण्यासाठी खा. संजय राऊत हे प्रयत्नशील होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक येथे नाराज माजी नगरसेवकांशी चर्चा केली होती. खासदार, आमदारांनी पक्षांतर केले असले तरी पक्ष जागेवरच असल्याचे त्यांनी वारंवार सूचित केले होते. या दौऱ्यातही त्यांनी कुणीही पक्षांतर करणार नसल्याचा दावा केला होता. पण तो फोल ठरल्याचे उपरोक्त घटनाक्रमावरून उघड झाले. ठाकरे गटातील फुटीला पक्षातील गटबाजीने हातभार लावला. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी स्थायी सभापती रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे या माजी नगरसेवकांसह प्रताप मेहेरोलिया, राजू लवटे, सचिन भोसले यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधितांनी वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते.

हेही वाचा- ‘या’ सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी; कारणे शोधण्यासाठी कृती समिती गठीत

मावळत्या नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. नाशिक शिवसेनेची (ठाकरे गट) जबाबदारी अनेक वर्षांपासून खासदार राऊत यांच्यावर आहे. या काळात राऊत यांच्या निकटच्या मंडळींना संघटनात्मक व अन्य महत्वाच्या पदांवर स्थान मिळाले. इतरांना जाणिवपूर्वक डावलले गेले. पक्षांतर्गत खदखद या निमित्ताने बाहेर आली आहे. पक्षात फूट पडू नये म्हणून राऊत प्रयत्नशील होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नाशिकचा दौरा केला होता. त्यावेळी अनेकांची अनुपस्थिती पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे दर्शविणारी होती. त्याचे प्रत्यंतर या फुटीतून येत आहे.