नाशिक : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या मोहिमा आखण्यात येत असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी झालेल्या विशेष तपासणी मोहिमेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे १४० नमुने संकलित करुन पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले. कृती आराखड्यातंर्गत अन्न व्यावसायिकांचा परवाना, नोंदणी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नमुने, आदींची तपासणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणवत्ता तपासण्यासाठी ही मोहीम होत आहे. याअंतर्गत नाशिक विभागात बुधवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. विविध आस्थापनांची तपासणी करून दुधाचे १४० नमुने संकलित करण्यात आले. जळगाव येथील मे. रविवार एजन्सी यांच्याकडील दूध आणि दुग्धजन्य अन्न पदार्थांचा सुमारे ४०९५ रुपयांचा साठा मुदतबाह्य आढळला. तो साठा नष्ट करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने नमूद करण्यात आले.