सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच धरणगावात शनिवारी रात्री तरुणाचा खून करण्यात आला. जिनिंगमध्ये जेवणावेळी ताट वाजवू नका, असे सांगितल्यावरून खून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी रविवारी पहाटेपर्यंत १७ जणांना ताब्यात घेण्यात आले. अरुण सोनवणे ऊर्फ कालू (, रा. दहिवद तांडा, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- नाशिक : जिंदाल कंपनीच्या भीषण आगीत ११ कामगार गंभीर जखमी, बचावकार्य सुरूच; २५ रुग्णवाहिका तैनात!

thane shivai nagar samaj bhavan marathi news
शिवाईनगर येथील समाजभवनावरून शिवसेना -भाजपत जुंपली
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…
Solapur, Moneylender, Hires Hitmen, firing on Businessman, Recover Overdue Loan, crime news, marathi news, police,
सोलापूर : कर्जवसुलीसाठी व्यापाऱ्यावर गोळीबार; सावकाराने सुपारी देऊन केला खुनीहल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगावातील एका जिनिंगमध्ये जिल्ह्यासह बिहारमधील काही मजूर कामाला आहेत. रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास जेवणावेळी बिहारमधील मजूर ताट वाजवीत होते. त्यावेळी कालू सोनवणे याने ताट वाजवू नका, असे सांगितले. त्यातून वाद झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. एकाने सोनवणेच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनोरे, धानोरे, गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलीस पथकाने संशयितांचा शोध घेतला.