लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत. काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीसमोरील बंडखोरीचे संकट टळले. परंतु, भाजपशी संबंधित एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीला बंडखोरीचा तोंड द्यावे लागणार आहे.

Nashik Division teachers constituency, vidhan parishad, candidate, wealthy, educational institute director
नाशिक शिक्षकमध्ये सर्व प्रमुख उमेदवार धनाढ्य अन शिक्षण संस्थाचालक
ncrease in number of voters in Nashik Division Teachers Constituency
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार संख्येत वाढ, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
Mumbai graduate elections marathi news
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत भाजप, शिवसेना ठाकरे गटाची कसोटी; १० जूनला निवडणूक
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”
nashik teachers marathi news
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मोजणीत जादा मते आढळल्याने गोंधळ
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक

बुधवारी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरी आणि नामसाधर्म्य असणाऱ्यांची उमेदवारी हे प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान ठरले. अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या माघारीसाठी त्यांचे बंधू महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न केले. काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांच्या माघारीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली. भाजपचे धनराज विसपुते यांनी रिंगणातून माघार घेतली असली तरी भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीत या निवडणुकीत फूट पडली. शिवसेना (शिंदे गट) जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभा केला आहे.

आणखी वाचा-लाकूड कापण्याच्या पात्यात सापडून तरुणाचा म़ृत्यू

माघारीनंतर एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह धोंडीबा भागवत, अनिल तेजा, अमृतराव उर्फ अण्णासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, आर. डी. निकम संदीप गुळवे (पाटील) यांचा समावेश आहे.

निवडणुकीतून संदीप गुळवे, शेख मुख्तार अहमद, रुपेश दराडे, कुंडलिक जायभावे, दत्तात्रय पानसरे, रखमाजी भड, सुनील पंडित, बाबासाहेब गांगर्डे, अविनाश माळी, निशांत रंधे, दिलीप पाटील, डॉ. राजेंद्र विखे-पाटील, धनराज विसपुते आणि प्रा. तानाजी भामरे या १५ जणांनी माघार घेतल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-नाशिकरोड परिसरातील वीज पुरवठा तीन दिवसांपासून खंडित – शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव

ठाकरे गटासमोर नामसाधर्म्याची डोकेदुखी

निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या एकाने तर ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या तिघांनी अर्ज दाखल केले होते.आदल्या दिवशी शिंदे गटाचे दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या नगर जिल्ह्यातील उमेदवाराने तर ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या संगमनेर येथील एकाने माघार घेतली. पण, ठाकरे गटासमोरील हे संकट दूर झालेले नाही. कारण संदीप गुळवे यांच्या नावासारखे धुळे येथील संदीप गुळवे (पाटील) आणि नगर येथील संदीप गुरुळे हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.