scorecardresearch

Premium

अबब…५५ हजार रुपये घरपट्टी धारकाला २७ लाखाची नोटीस, अवाजवी मालमत्ता कर नोटिसांमुळे धुळेकर हैराण

शहरात ५५ हजार रुपयांच्या घरपट्टी धारकाला २७ लाख रुपयांची नोटीस, तर दोन हजार ५०० रुपये घरपट्टी धारकाला ५२ हजार रुपयांची नोटीस बजावण्यात आली.

27 lakhs rupees notice to house holder who pay house tax 55 thousand rs
मनपा प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने धुळेकरांवर मालमत्ता कर लावला आहे. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

धुळे : शहरात ५५ हजार रुपयांच्या घरपट्टी धारकाला २७ लाख रुपयांची नोटीस, तर दोन हजार ५०० रुपये घरपट्टी धारकाला ५२ हजार रुपयांची नोटीस बजावण्यात आली. महानगर पालिकेच्या अवाजवी मालमत्ता करांच्या नोटिसांमुळे धुळेकर हैराण झाले असून तातडीने वाढीव मालमत्ता कर हटवावा, महापौरांनी ठराव करावा. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराथी यांनी दिली.

Pune police seized drugs
पुणे पोलिसांनी तीन दिवसांत साडेतीन हजार कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्स केले जप्त
zenith drugs to bring ipo
झेनिथ ड्रग्जची ४०.६७ कोटींची भागविक्री खुली
Enforcement Directorate likely to file a case in the extortion case of 164 crores
१६४ कोटींच्या खंडणीप्रकरणी ईडीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता
ruchi kalra iitian who built a net worth of 2600 crore
७३ जणांचा गुंतवणुकीस नकार, तरीही उभारल्या ५२ हजार कोटींच्या दोन कंपन्या; वाचा रुची कालराच्या यशाची ‘ही’ रणनीती!

गुजराथी यांनी पत्रकार परिषद घेत महापालिकेच्या भोंगळ कारभारावर टीका केली. मनपा प्रशासनाने नियमबाह्य पध्दतीने धुळेकरांवर मालमत्ता कर लावला आहे. एकही सुविधा नियमितपणे न देवू शकणार्या मनपाने मालमत्ता कराबाबत राज्यात इतिहास रचला आहे. राज्यातील अ ते ड वर्ग मनपा आणि धुळे मनपाच्या मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मालमत्ता कर आकारणीच्या ठेक्याचे काम एका वर्षात पूर्ण होवू शकले असते, परंतु, असे असताना पाच वर्षांसाठी १० कोटी रुपयांचा ठेका दिलाच कसा, असा प्रश्न गुजराथी यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-शाळा, महाविद्यालयांबाहेर टवाळकी करणाऱ्यांनो सावधान, धुळे पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम

शहराबाहेर असलेल्या विराज स्टाईल्सला ५५ हजार रुपये मालमत्ता कर होता, आता तो साडेचार लाख रुपये करण्यात आला आहे. करापोटी तब्बल २७ लाखांची नोटीस मनपाने त्यांना पाठवली आहे. कर आकारणीने धुळ्यातील मालमत्ता धारक हवालदिल झाले आहेत. ठेका दोन वर्षापूर्वी दिला गेला. परंतु, त्याआधीपासूनची देयके दिली गेली. महापालिकेत ३१ डिसेंबरपर्यंत भाजपची सत्ता आहे. महापौरांनी महासभा घेवून ठरावाद्वारे धुळेकरांची आर्थिक अत्याचारातून सुटका करावी, असे साकडे गुजराथी यांनी महापौरांना घातले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 27 lakhs rupees notice to house holder who pay house tax 55 thousand rs dhulekar upset due to excessive property tax notices mrj

First published on: 06-12-2023 at 13:37 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×