नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर5 crore approved for the Godavari river Mahaarti said minister Sudhir Mungantiwar | Loksatta

नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर

महाआरतीसाठी ११ पुजाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे

नाशकातील गोदावरी नदीवर दररोज निनादणार महाआरतीचे सूर, पाच कोटींचा निधी मंजूर

अयोध्येतील शरयू नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आता नाशकातील गोदावरी नदीची महाआरती केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ही महाआरती होईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. शिवाय ११ पुजाऱ्यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.

नाशिक : गोदाकाठी वैशिष्ठ्यपूर्ण गुलाब उद्यान साकारण्याची तयारी ; स्मार्ट सिटी योजनेत ६०० रोपांची लागवड

सांस्कृतिक मंत्र्यांच्या या घोषणेनंतर संध्याकाळी सात वाजता गोदावरी नदीवर आरतीचे सूर निनादणार आहेत. गोदावरी नदीच्या काठावर नाशिक शहर वसलेलं आहे. याठिकाणी कुंभमेळादेखील भरत असतो. शहरातून वाहणाऱ्या या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गंगा नदीप्रमाणेच गोदावरी नदीलादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशकातील त्र्यंबकेश्वर हे तीर्थस्थान देशभरात प्रसिद्ध आहे.

फक्त नद्या नव्हे तर आमचे विचार, संस्कार आणि जीवनही प्रदूषित झालंय : देवेंद्र फडणवीस

पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांच्याकडून गोदावरीच्या नदीच्या महापूजेसाठी पाठपुरावा केला जात होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अयोध्या, वाराणसी, हरिद्वारप्रमाणेच आता गोदावरीचीही महाआरती दररोज केली जाणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 10:20 IST
Next Story
जळगाव: ‘एकनाथ खडसे’ घेणार गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन