नाशिक – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात काही दिवसांपूर्वी कुरिअर वाहनावर पडलेल्या दरोड्यातील आणखी ६०० ग्रॅम सोने व ३० किलो चांदी हस्तगत करत आरोपींच्या वाहन चालकास चांदवड येथून अटक करण्यात आली आहे.

मुंबई येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या वाहनावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात पाच ते सहा संशयितांनी दरोडा टाकला होता. या वाहनातून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करण्यात येत होती. दरोड्यात साडेचार किलो सोन्याचे दागिने, बिस्कीट आणि १३५ किलो चांदीचे दागिने व विटा याप्रमाणे तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलिसांनी आग्रा जिल्ह्यातील खेरागड, इटौरा परिसरातून देवेंद्रसिंग उर्फ करवा परमार, आकाश परमार, माजी सैनिक हुबसिंग ठाकूर, फळ विक्रेता शिवसिंग ठाकूर, माजी सैनिक जहिर खान यांना मागील आठवड्यात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २.५ किलो सोन्याचे दागिने आणि ४५ किलो चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

हेही वाचा >>>धुळ्यात आशासेविका, गट प्रवर्तकांचे आंदोलन

दरम्यान, या गुन्ह्यातील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच घोटी पोलिसांचे पथक आग्रा येथे पुन्हा गेले होते. आग्रा येथून पथकाने ५९६ ग्रॅम सोने, २९.७४६ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा चालक नंदकिशोर गारे (४५. रा. चांदवड) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी तीन किलो ९५ ग्रॅम सोने, ७५ किलो ५२३ ग्रॅम चांदीचे दागिने असा दोन कोटी ६० लाख ६६ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित संशयित आणि मालाचा शोध घेण्यात येत आहे.