जळगाव – महानिर्मितीच्या भुसावळजवळील दीपनगर येथील वीज प्रकल्प ६६० मेगावॉट स्थापित क्षमतेच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित संच क्रमांक सहाचे बाष्पक प्रदीपन महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) अभय हरणे यांच्या हस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून यशस्वीरीत्या करण्यात आले. महानिर्मितीचा हा ६६० मेगावॉट क्षमतेचा चौथा संच आहे. यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे, भुसावळ प्रकल्प आणि वीज केंद्राचे मुख्य अभियंते अनुक्रमे विवेक रोकडे, मोहन आव्हाड यांची उपस्थिती होती.

भुसावळ येथे महानिर्मितीचे ५०० मेगावॉट क्षमतेचे दोन संच आणि २१०मेगावॉट क्षमतेचा एक संच यांमधून नियमित वीजनिर्मिती सुरू असून, त्यात आगामी काही दिवसांत भर पडून भुसावळ वीजनिर्मिती केंद्राची स्थापित क्षमता १८७० मेगावॉट होणार आहे. संच क्रमांक सहाचे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम मेसर्स भेल कंपनी करीत आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावॉटच्या तीन संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. चंद्रपूर येथे २९२० मेगावॉट, कोराडी येथे २१९० मेगावॉट, आता भुसावळ येथे १८७० मेगावॉट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीजनिर्मिती केंद्र म्हणून साकारणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून या संच क्रमांक सहाला जूनमध्ये कार्यान्वित करण्याचे, तसेच ऑगस्टमध्ये हा संच पूर्णक्षमतेने वाणिज्यिक तत्त्वावर वीजनिर्मिती करेल, असे प्रकल्प अधिकार्‍यांचे नियोजन आहे. भुसावळ प्रकल्पाचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कामगार अथक परिश्रम घेत असल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित