नाशिक शहरातील उंटवाडी भागात भरधाव स्विफ्ट डिझायर मोटारीने प्रथम दुचाकी, नंतर टाटा नेक्सन वाहनास धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत दोन पिशव्या भरून ५०० आणि दोन हजार रुपयांसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा आढळल्या. त्यावर केवळ शालेय प्रकल्पांसाठी वापर आणि चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख असून त्या लहान मुलांच्या खेळण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नोटा बाळगणाऱ्या वाहनाचा चालक मद्यपान केलेला होता. त्याच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या नोटांचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने तपास सुरु केला आहे.

हेही वाचा- नाशिक : पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे नवीन कामांवर निर्बंध; प्रशासकीय राजवटीतील आचारसंहितेविषयी संभ्रम

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

उंटवाडी रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत ज्ञानेश्वर लोखंडे (इंदिरानगर) यांनी तक्रार दिली. तक्रारदार ज्ञानेश्वर हे मित्र सोमनाथ गांगुर्डे याच्या समवेत टाटा नेक्सन मोटारीने सिटी सेंटर मॉलकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात होते. यावेळी अंबडकडून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायरने दुचाकीस्वारास धडक देऊन जखमी केले. त्यानंतर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने टाटा नेक्सनला पाठीमागून धडक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अपघातात दुचाकीचालक अमोल बुरकुले जखमी झाला. दुचाकी आणि टाटा नेक्सनचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. अपघातग्रस्त स्विफ्ट मोटारीत मोठ्या प्रमाणात नोटांची बंडले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तपासणीसाठी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा- नाशिक: डॉ. प्राची पवार हल्ला प्रकरणात तीन संशयित ताब्यात – रुग्णालयात करोनाबाधिताच्या मृत्यूमुळे हल्ला

स्विफ्ट मोटारीचा चालक चंद्रकात दाहिजे (२८, मिलिंदनगर, तिडके कॉलनी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द वाहनाचे नुकसान व व्यक्तिगत सुरक्षेला धोका निर्माण केल्यावरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली. न्यायालयात संशयिताला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात शालेय प्रकल्पाच्या नोटा बाळगण्याचे कारण काय, त्या कुठून आणल्या, कुठे नेल्या जाणार होत्या, याची शहानिशा केली जाणार आहे.

हेही वाचा- सुवर्णनगरी जळगावात सोने-चांदी दरात चढ-उतार सुरूच

नोटांवर शालेय प्रयोजनार्थचा उल्लेख

अपघातग्रस्त स्विफ्टमधून ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची मोठ्या प्रमाणात बंडले आढळली. हुबेहुब ५०० आणि दोन हजारासारख्या दिसणाऱ्या या नोटावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाचा उल्लेख आहे. तसेच त्यावर केवळ शालेय प्रकल्पाच्या वापरासाठी असेही नमूद आहे. पडताळणीअंती त्या मुलांच्या खेळण्यातील वा अभ्यासासाठीच्या असल्याचे निष्पन्न झाले. या बाबतची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. शाळेत मुलांना चलनाची माहिती देण्यासाठी अशा प्रकारचा नोटांचा वापर केला जातो. लहान मुलांच्या खेळांत अनेकदा अशा नोटांचा वापर होतो. अपघातग्रस्त वाहनातील या नोटा त्याच्याशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत.