नाशिक – विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या युवतीचा बुडून मृत्यू झाला. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कळवण तालुक्यातील जांभुळपाडा शिवारात राहणारी चित्रा ठाकरे ही स्वयंपाकाला लागणारे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती.
विहिरीच्या कठड्याजवळ उभी असताना पाय घसरुन तोल गेल्याने ती विहिरीत पडली. तिचा बुडून मृत्यू झाला.