नाशिक: जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रम शाळेतील साडे दहा हजार शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचा ( एनडीएसटी सोसायटी) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. १८ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने शिक्षकांचे राजकारण रंगू लागले आहे. पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच शिक्षक राजकारणाचे केंद्र हे िपपळगाव बसवंत होते. परंतु, या वेळी सर्व वाटाघाटी आणि चर्चासत्रांचे केंद्र हे मालेगाव झाले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक यांच्या दीड, दोन महिन्यांपासून मालेगाव वाऱ्या वाढल्या आहेत.

१९६४ मध्ये माजी शिक्षक आमदार टी. एफ. पवार, फिरोज बादशहा, जे. बी. सोनार यांनी मालेगावात शिक्षक लोकशाही संघाची (टीडीएफ) मुहूर्तमेढ रोवली, तेव्हापासून म्हणजे ६० वर्षांपासून मालेगाव हे माध्यमिक शिक्षक संघटना आणि टीडीएफचे ऊर्जा केंद्र आहे. राज्य पातळीवरील अनेक आंदोलनांची मुहूर्तमेढ मालेगावातून सुरू झाली, हे करत असताना टीडीएफच्या जिल्ह्यातील नेत्यांनी १९८५ पासून शिक्षकांची वाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीवर ताबा मिळविला. तेव्हापासून एक पंचवार्षिक वगळता ही संस्था सतत टीडीएफच्या ताब्यात राहिलेली आहे. असे असले तरी एनडीएसटीचे सत्ताकेंद्र ४० वर्षांपासून पिंपळगाव बसवंत राहिले.

20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून आले होते. तेव्हापासून मालेगाव हे एनडीएसटीचे सत्ता केंद्र झाले होते. निकम पायउतार झाल्यानंतर हे सत्ताकेंद्र पुन्हा पिंपळगावला गेले. अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर निकम यांनी ‘टीडीएफ आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. निवडणूक जाहीर झाल्याने नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. जिल्हाभरातील नेत्यांची मालेगाव येथे रीघ लागली आहे. म्हणूनच पिंपळगावचे सत्ताकेंद्र हे मालेगावला सरकले आहे. अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि टीडीएफचे नेते फिरोज बादशहा, आर डी. निकम, एस बी देशमुख, गुलाबराव भामरे यांचे पॅनल निवडणुकीत राहणार आहे. इतर पॅनलही लवकरच घोषित होतील. शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा नेहमीच गाजत असते. या सभेत वादविवाद, प्रसंगी हाणामारीचेही दर्शन कायम घडते.