जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा शुक्रवारी चोपड्याकडून भुसावळकडे जात असताना, यावल तालुक्यातील किनगावनजीक या ताफ्यात पुढे असलेल्या वाहनाने गतिरोधकानजीक अचानक ब्रेक लावला. यामुळे ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर धडकली. यात वाहनाचे नुकसान झाले असून, कार्यकर्ते सुखरूप आहेत.

हेही वाचा – वंचितचेही शक्तिप्रदर्शन; करण गायकर, मालती थवील यांचे अर्ज दाखल

हेही वाचा – केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर, चोपड्यातील सभेत शरद पवार यांची टीका

रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी शरद पवार यांच्या चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळमध्ये जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चोपडा येथील जाहीर सभा झाल्यानंतर शरद पवार हे भुसावळकडे रवाना झाले. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील पुढील मोटारचालकाने किनगावनजीक असलेल्या गतिरोधकाजवळ अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर धडकली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.