जळगाव – भोजन पुरवठादाराचे देयक मंजूर झाल्यानंतर त्यासाठी २० हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लेखाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदारांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे. सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या (दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगाव) नावाने चोपडा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला (नवीन) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात लागणारा दैनंदिन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर वसतिगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यात ७३ लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे देण्यात आले आहेत. या बदल्यात तक्रारदारांकडे एकूण रकमेच्या अर्धा टक्का याप्रमाणे प्रथम ३६ हजार ५०० रुपये आणि नंतर तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लेखाधिकारी रवींद्र जोशी (५७, नेहरुनगर, मोहाडी रोड, जळगाव) याने केली. याबाबतची तक्रार जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

हेही वाचा – नाशिक : इगतपुरी-भुसावळ, पुणे एक्स्प्रेससह काही गाड्या दोन दिवस बंद

तक्रारीची पडताळणीसाठी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पथक नियुक्त करीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सापळा रचला. मागणी केलेली लाच स्वतःच्या कक्षात स्वीकारताना जोशी यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी यावल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.