घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते, असा अनेकांचा गैरसमज आहे. या नालीच्या विक्रीसाठी काळ्या रंगाच्या घोड्यांना असह्य वेदना पोहोचविणार्‍या व्यावसायिकांना वन्यजीव संरक्षण संस्थेने कायद्याच्या कचाट्यात अडकविले आहे. तीनपैकी एका व्यावसायिकाला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळताच अन्य व्यावसायिक फरार झाले. ताब्यात घेतलेल्या एकाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>“…तर त्यावर माझी स्वाक्षरी…”; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडणाऱ्या मविआ आमदारांना अजित पवारांचा घरचा आहेर

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

शहरात दोन-तीन काळे घोडे तीन-चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात दिसून येत आहेत. या घोड्यांसोबत दोन जण आहेत. हे घोडे सवारी करण्यासाठी नव्हे; तर घोड्याची नाल विक्री करण्यासाठी फिरविले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्राणी क्लेश कायदा समितीचे सदस्य रवींद्र फालक यांना मिळाली. एक नाल दिवसभर कसा विकत असणार, हा प्रश्‍न फालक यांच्यासमोर होता. त्यांनी तत्काळ धाव घेत त्या घोडेवाल्यास शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो पसार झाला होता. त्या भागात विचारपूस करून माहिती घेतली असता, धक्कादायक खुलासा झाला.

हेही वाचा >>>नाशिक : अपघातग्रस्त मोटारीत बनावट नव्हे तर खेळण्यातील नोटा; मद्यपी चालकाविरोधात गुन्हा

काळ्या घोड्याची नाल ही शुभ मानली जाते. त्यामुळे अंधश्रद्धाळूंच्या दृष्टीने ही नाल महत्त्वाची मानली जाते. सबंधित व्यक्तीकडे वीस ते पंचवीस नाल असतात. या नालसाठी दीडशे ते दोनशे रुपये अनेकांनी मोजल्याचे स्पष्ट झाले आहे. नाल विक्री झाल्यानंतर हा व्यावसायिक घोड्याच्या पायाला पुन्हा नाल ठोकतो आणि ग्राहक आल्यावर पुन्हा काढतो. त्यामुळे घोड्याच्या खुरांना अनेक छिद्रे पडून जखमा होत आहेत. यामुळे थोडा लंगडतो आहे. हे दोघे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ आणि एकजण स्वातंत्र्य चौकात फिरत असतो, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक : पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे नवीन कामांवर निर्बंध; प्रशासकीय राजवटीतील आचारसंहितेविषयी संभ्रम

वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, पंकज सूर्यवंशी, रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, मयूर वाघुळदे, नीलेश ढाके, वासुदेव वाढे यांनी या व्यावसायिकांचा शहरात शोध सुरू केला आहे. स्वातंत्र्य चौकात घोड्यासह उभा असलेल्या व्यावसायिकाला ताब्यात घेतले आणि त्याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले. तेथे अणलेल्या घोड्याच्या पायाला जखम झाली आहे. वारंवार नाल बदलविण्याच्या प्रयत्नात ही जखम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या व्यावसायिकाने जखमेवर हळद भरल्याचेही दिसून आले आहे. ताब्यात घेतलेल्या एकाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी अन्य दोघांचाही शोध सुरू केला. तिघेही व्यावसायिक परप्रांतीय आहेत. कुणीही प्राण्यांचा छळ करीत असेल तर नागरिकांनी पुढाकार घेऊन संबंधित व्यक्तींना समज द्यावी. प्राण्यांचा छळ थांबवावा तसेच प्रशासनाने या प्रकारचे अमानवीय कृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

प्राण्यांचा छळ करणे हा प्राणी क्लेश कायद्यांतर्गत गुन्हा असून, कठोर शिक्षेची तरतूद आहे. संबंधित व्यक्तीला शोधून नेमका प्रकार काय आहे, ते समजावे लागेल. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून घोड्याची तपासणी करून मग संबंधित व्यक्ती दोषी आढळला तर त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावू.- बाळकृष्ण देवरे (वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव)