scorecardresearch

धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा

धुळे शहरासह जिल्ह्यात सोडा गाडीवर दारु विक्री करणे, दारु पिणे असे प्रकार केले तर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले जातील, अशा प्रकाराची अजिबात गय करणार नाही.

धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता


धुळे शहरासह जिल्ह्यात सोडा गाडीवर दारु विक्री करणे, दारु पिणे असे प्रकार केले तर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल केले जातील, अशा प्रकाराची अजिबात गय करणार नाही. असा इशारा सहायक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिला आहे.शहरातील अवैध धंद्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारणारे युवा भारतील पोलीस प्रशासनातील अधिकारी रेड्डी यांनी आता आपला मोर्चा शहरातील अवैधपणे चालणार्या सोडावॉटर गाड्यांवरील दारु विक्री आणि मद्यपान करणार्यांकडे वळवला आहे.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस, नव्या राजकारणाची नांदी आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटतं…”

त्यांनी देवपूर भागात अशा सोडा गाडींवर कारवाई देखील केली. जर सोडा गाडीवर कोणी दारुची विक्री करत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी बसून दारु पित असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, पोलीस अशांवर कठोर कारवाई करतील, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या