scorecardresearch

Premium

जळगाव: साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडे यांच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार उघड

मिरवणुका शांततेत पार पडल्या. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

sambhaji bhide with nathuram godse image in ganesh visarjan procession
गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य करत जयघोष करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य करत जयघोष करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिरवणुका शांततेत पार पडल्या. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी

resident doctors, MARD, MP Hemant Patil, protest
खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात मार्डचे आज आंदोलन
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Girlfriend arrested
बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी, त्रासलेल्या प्रियकराने केली आत्महत्या; प्रेयसीसह चौघांना अटक
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम

अमळनेर शहरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शहराच्या पानखिडकी परिसरातील जय बजरंग गणेश मंडळाची मध्यवर्ती भागातून निघालेली मिरवणूक बोरी नदीलगतच्या दगडी दरवाजालगत आली. तेथे मिरवणुकीत सामील झालेल्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांच्या हातात नथुराम गोडसे, संभाजी भिडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या प्रतिमा होत्या. ढोल-ताशांसह आवाजाच्या भिंती उभारत संबंधितांच्या प्रतिमा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी नृत्य केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजींच्या या कर्मभूमीत फेब्रुवारी २०२४ मध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत हे संमेलन १९५० नंतर पहिल्यांदा होत आहे. संमेलनाला अजून काही महिने बाकी असताना गोडसे, संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य केल्याचा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Activist dance with holding images of sambhaji bhide with nathuram godse in ganesh visarjan procession zws

First published on: 30-09-2023 at 20:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×