नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियमित लसीकरणात आता पोलिओ लसीकरणाची अतिरिक्त मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा- Jindal fire accident : आगीच्या कारणांचा शोध सुरू, चौकशीअंती गुन्हा दाखल होणार

Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिली मात्रा तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरी मात्रा अशा एकूण दोन मात्रा देण्यात येत आहेत. तथापि, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक जानेवारीपासून अतिरिक्त मात्रा बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. सदर लसीकरणाचा उद्देश हा पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे तसेच समाजामध्ये सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.

हेही वाचा- ‘अजित पवार यांचे वक्तव्य समाज गढूळ करणारे’; चित्रा वाघ यांची टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार जानेवारीपासून तिसरी मात्रा नियमित लसीकरणात समाविष्ट करण्यात येत आहे. लसीची तिसरी मात्रा बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. सदर मात्रा नऊ ते बारा महिने या वयोगटातील बालकांना गोवर रूबेला लसीच्या पहिल्या मात्रेबरोबर देण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य विभागातील सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व पालकांनी मात्रांमधील बदल लक्षात घेऊन आपल्या मुलांना वयोगटाप्रमाणे वयाची सहा आठवडे पूर्ण झाल्यावर, १४ आठवडे पूर्ण झाल्यावर आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पहिली, दुसरी आणि तिसरी अशा तीन मात्रा जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे.