काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी तर काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली. आज हेच पक्ष राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्रितपणे मोर्चा काढत असल्याबाबत पत्रकार परिषदेत उपस्थित झालेल्या प्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढल्याचे दिसले. त्यांनी ध्वनिक्षेपक हाती घेत पत्रकारांना खडे बोल सुनावले. दादांचा आवाज आधीच भारदस्त. त्यात पारा चढलेला व सोबतीला ध्वनिक्षेपक. यामुळे वातावरणाचा रागरंग क्षणार्धात पालटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक येथे मंगळवारी पोहोचलेल्या संघर्ष यात्रे दरम्यान असा काही प्रश्न उपस्थित होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. मिनी मंत्रालयातील राजकारणाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली दरी कशी मिटणार, असा प्रश्न काही स्थानिक पदाधिकारी व सदस्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करणारे विरोधक आज सेना-भाजपच्या विरोधात यात्रा काढत असल्याचा संदेश गेला. हा विरोधाभास काहींना खटकल्याने त्यांनी यात्रेत सहभागी होणे टाळले. काहींनी लग्नाचे कारण देऊन अंतर राखले. या स्थितीवर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. नाशिक येथे पोहोचलेल्या संघर्ष यात्रेत मंगळवारी सकाळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बऱ्याच कालावधीनंतर दादांना राग आल्याचे पक्षीय पदाधिकाऱ्यांनाही पाहावयास मिळाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar express anger on journalist in nashik
First published on: 19-04-2017 at 03:25 IST