नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतंर्गत पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. आरती तसेच संकल्प पूजन करण्यात आले. पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, राज्यपाल रमेश बैस आदी वरिष्ठ नेत्यांनी दर्शन घेत पूजन केले आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सायंकाळी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. खासदार सुनील तटकरे, आ. छगन भुजबळ, आ. धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी फलकबाजी केली होती. पवार यांच्या दर्शनकाळात इतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने अन्य भाविकांची गैरसोय झाली. यावेळी महंत सुधीरदास महाराज यांनी पवार यांच्या हस्ते संकल्प पूजन केले. श्रावणातील एकादशीपासून पुढील श्रावणापर्यंत एकादशीला रामरायाला अभिषेक करण्यात येणार आहे. हेही वाचा.नाशिक : राका कॉलनीतील घरफोडी प्रकरणी तीन संशयित ताब्यात संकल्प पूजनानंतर देवस्थानच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी भजनी मंडळातील महिलांशी संवाद साधला. साधुग्राम प्रश्नाविषयी शेतकऱ्यांनी पवार यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. याबाबत तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. हेही वाचा.अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाच्या नेत्याच्या कौतुकाने आमचं वय बाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळाराम मंदिर परिसरात असलेल्या भजनी मंडळातील महिलांशी संवाद साधला. महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला का, असा प्रश्न विचारला असता उपस्थित महिलांनी आमचं वय बाद झाले आहे, असे उत्तर दिले.