लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यात प्रशासकीय यंत्रणेसह पालकमंत्र्यांचाही सहभाग आहे. त्यांचीच वाहने धरणगाव तालुक्यात धावत आहेत. वाळूमाफिया, सट्टेवाले, मद्यविक्रेते, बनावट रेशन दुकानदारांना त्यांचा आशीर्वाद असेल तर जनतेने कुणाकडे न्याय मागावा, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला आहे. दुसरीकडे, आम्ही वाळूमाफियांना मदत करीत असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकरांना दिले आहे.

Ashok Chavan, Voters called
अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून अनधिकृत वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धऱणगावसह पाळधी येथे दुकानांसह टपर्यांवर मद्यविक्री केली जात असल्याचा आरोप केला.

हेही वाचा… शासकीय महाविद्यालयाकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत न झाल्याने रुग्णांचे हाल

वाळूमाफियांसह अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. वाळूमाफियांच्या प्रश्नावर पालकमंत्री डोळेझाक का करतात, असा प्रश्न त्यांनी केला. आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मोटारीला अवैध वाळू वाहतुकीच्या मालमोटारीमुळेच अपघात झाला. आव्हाणे गावात काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. त्यात नागरिक जखमी झाले होते. अशी गंभीर स्थिती असताना पालकमंत्री व प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप देवकर यांनी केला.