नाशिक – जळगाव येथील नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था संचलित नोबेल सायन्स टॅलेंट सर्च या राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षेत अंबड येथील ग्लोबल व्हिजन स्कूलचा विद्यार्थी अमेय अमृतकरने संपूर्ण महाराष्ट्रात नववा क्रमांक पटकावला. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात आली. पहिला टप्पा ऑनलाईन, दुसरा ऑफलाइन आणि तिसरा टप्पा मुलाखत स्वरूपाचा होता.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी (गांधीनगर), सायन्स स्पेस सिटी (अहमदाबाद), तसेच इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (अहमदाबाद) येथे भेट देण्याची संधी मिळाली. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना सेंटर फॉर क्रिएटीव्ह लर्निंग येथे विविध विज्ञान प्रयोग अनुभवण्याची आणि उपग्रह साहित्य व इंजिन प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. स्पर्धेतील कामगिरीबद्दल शाळेचे सचिव शशांक मणेरीकर, संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर,शिक्षक व विद्यार्थ्यांनी अमेयचा सत्कार करीत अभिनंदन केले.