नाशिक : आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या बालिकेची हत्या

आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या बालिकेची गळा चिरून हत्या करण्यात आली. सातपूर येथील ध्रुव नगरात हा प्रकार घडला आहे.

baby girl murder Satpur Nashik
आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या बालिकेची हत्या (संग्रहित छायाचित्र)

नाशिक – आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या बालिकेची गळा चिरून हत्या करण्यात आली. सातपूर येथील ध्रुव नगरात हा प्रकार घडला आहे. हत्येच्या कारणाविषयी वेगवेगळे तर्क लढविले जात असताना पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटत आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा

हेही वाचा – तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना अपघातात नाशिकच्या तीन तरुणांचा मृत्यू; पाच जखमी

गंगापूर रोडजवळील ध्रुव नगरात भुषण रोकडे हे पत्नी युक्ता आणि तीन महिन्यांची मुलगी धुव्रांशी तसेच आईसह राहतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास युक्ता घरी एकट्या असताना एक महिला घरात आली. तिने विचारपूस करण्याचा बहाणा करत युक्ता यांच्या नाकाला रुमाल लावला. या रुमालावर कुठलेतरी औषध टाकण्यात आले होते. त्यामुळे युक्ता या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर संबंधित महिलेने घरात असलेल्या तीन महिन्यांच्या धुव्रांशीची हत्या केल्याचा संशय आहे. काही वेळाने युक्ता यांच्या सासूबाई घरात आल्या असता युक्ता बेशुद्ध अवस्थेत तर, धुव्रांशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी रोकडे यांच्या घराकडे धाव घेतली. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 19:52 IST
Next Story
नाशिक : अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार चंद्रपूरच्या वैशाली गेडाम यांना जाहीर
Exit mobile version