लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबार : आपल्या कामाविषयी निष्ठा असेल तर नदी, नाले, ऊन, वारा, पाऊस कोणाचे काहीही बिघडवू शकत नाही. अशा संकटांना तोंड देत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणारे या समाजात अनेक जण आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नयामाळ येथील अंगणवाडी सेविका वंती वळवी त्यापैकीच एक म्हणावी लागेल.

आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरुन कसरत करुन ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफित सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. वंती वळवी ही अंगणवाडी सेविका तलोदा तालुक्यातील नयामाळ (शिर्वे) येथे कार्यरत आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची क्षेत्रनिहाय बैठक होत असते. या बैठकीत संपूर्ण महिन्याभरातील कामाचा आढावा घेतला जातो. यांत जन्म-मृत्यू, गरोदर माता, लसीकरण, आहार वाटप, कुपोषित माता बालकांचे वजन, उंची, किशोरवयीन मुली अशा सर्व माहितीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार अंगणवाडीला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आपल्या केंद्रातील बालक, महिला लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून वंती वळवी यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीची पर्वा न करता धोकादायक प्रवास करुन ती ओलांडली.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी धुळ्यात मोर्चा

वळवी ही अंगणवाडी सेविका मानधनावर काम करते. परंतु, आपल्या कामाविषयी प्रामाणिक असल्याने जीवाची पर्वा न करता शासनाच्या कामासाठी नयामाळ ते इच्छागव्हाण हे अंतर पायी चालत गेली. त्यानंतर इच्छागव्हाण, सोमावल बैठकीस भर पावसात पोहचली. यामुळे या अंगणवाडी सेविकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anganwadi worker cross the flooded river video goes viral mrj
Show comments