महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची २२ मोर्च रोजी गुढीपाडव्याला मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या जाहीर सभेसाठी शहरातील सातपूर विभाग मनसेने कंबर कसली आहे. या सभेसाठी सातपूर विभागातून शंभर वाहनांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक सलिम शेख यांनी दिली.  सातपूर विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत शेख यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी नगरसेवक योगेश शेवरे, कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस सोपान शहाणे, विभाग अध्यक्ष बंटी लभडे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन खताळे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मालेगावातील उध्दव ठाकरे यांच्या सभेला निफाड तालुक्यातूनही बळ

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असल्याने हजारो मनसैनिक नाशिकमधून राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले. २२ मार्च रोजी दुपारी एक वाजता जिजामाता मैदानातून वाहने मुंबईकडे प्रस्थान करणार असून सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन शेख यांनी केले. सातपूरकरांनी केलेल्या नियोजनाचे शहराध्यक्ष दातीर यांनी कौतुक करत सातपूरकरांची ही पध्दत सर्वत्र वापरणार असल्याचे सांगितले. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही दातीर यांनी केले. बैठकीस कैलास जाधव, किशोर वडजे, अतुल पाटील, वैभव रौंदळ आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrangement of hundred vehicles from satpur for raj thackeray s rally zws
First published on: 19-03-2023 at 15:04 IST