नाशिक – अशोक खरातविरूध्द पहिला गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणाची माहिती टप्प्याटप्प्याने पुढे येत आहे. आपण अवतार धारण केला असल्याचा त्याचा दावा होता. लोक त्याला बळी पडले. आता त्याचा खरा अवतार समोर आला आहे, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाणला.
राधाकृष्ण विखे हे नाशिक येथे भाजप पक्ष कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिलांना दोष देत नाही. खरातने वलय तयार केलं होते. अनेकांनी आर्थिक व्यवहार केले. समारंभात पाय धुतांना काही जण दिसले. कुणाच्या प्रपंचात काय चालले, हे माहिती नाही. आर्थिक व्यवहाराची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने घेण्यात येत आहे. अंजली दमानिया जे सांगत आहेत, त्यातील खरे-खोटे समोर येईल. खरात समता पतसंस्थेवर होता. त्यविषयीा. सहकार विभाग कारवाई करेल. खरातकडे सगळे अधिकार होते.
अंधश्रद्धेमुळे असंख्य महिला बळी पडल्या. त्यात त्यांचा दोष काय, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही खरातने बांधलेल्या मंदिरात गेले होते. आपलेच कार्यकर्ते भरीस घालतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला आले असता देवाकडे जायचे आहे, असे म्हणाले. यासाठी दीपक केसरकर यांचा आग्रह होता. अज्ञातातुन झालेला हा प्रकार आहे. एखाद्याविषयीची माहिती नसताना जाणे वेगळे आणि माहिती असूनही जाणे गंभीर, असेही विखे पाटील यांनी नमूद केले. हा प्रकार राजकारण्यांना धडा शिकवणारा आहे. राजकारणी १०० टक्के धडा घेतील, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथक नेमले आहे. त्यांना काम करू दिले पाहिजे. आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झाला. त्या लोकांना कुणाची भिती राहिली नाही. हा प्रकार निंदनीय असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. टीसीएस कंपनी बंद करण्यापेक्षा तेथील दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. तेथील घाण काढून टाका. हा गंभीर प्रकार आहे. याठिकाणी लाखोंहून अधिक लोक काम करतात. त्यांच्या रोजगाराचा विचार व्हायला हवा. कंपनी बंद झाली तर मुल बेरोजगार होतील. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर या विषयी चर्चा करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
