लांडे खून प्रकरण : भानुदास कोतकरसह तीन मुलांना शिक्षा, आमदार कर्डिले यांची मुक्तता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात येथील न्यायालयाने काँग्रेसचा निलंबित जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर संशयित भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात ऐनवेळी साक्ष बदलल्यावरून मृत लांडे यांची पत्नी व भावासह १२ जणांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok lande murder case kotakar in jail
First published on: 12-04-2016 at 02:25 IST