लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात ११८ पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत काही कारणास्तव उपस्थित न राहिलेल्या ५४ उमेदवारांची रविवारी मैदानी चाचणी घेण्यात आली. आणखी वाचा-वसंत गिते यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याचे, जागेचे भाडे वसूल करा; देवयानी फरांदे यांची मागणी पोलीस आयुक्तालय हद्द परिसरात १९ ते २९ जून या कालावधीत पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी झाली. या भरतीमध्ये काही कारणास्तव येऊ न शकलेले उमेदवारांना रविवारी संधी देण्यात आली. याअंतर्गत ५४ उमेदवार उपस्थित झाले. त्यात ५० पुरूष व महिला, दोन तृतीयपंथी, दोन माजी सैनिक यांचा सहभाग होता. संबंधितांची भरती प्रक्रियेसाठी हजेरी पट पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदाणी चाचणी घेण्यात आली. पाच उमेदवार अपात्र ठरले.