नाशिक : अवैधरित्या सावकारी करणाऱ्या तीन संशयितांविरूध्द सिन्नर पोलीस ठाण्यात एक वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयित वयोवृध्द असल्याने अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

सिन्नर तालुक्यात संशयित तुकाराम कर्डक, जिजाबाई कर्डक, गणेश कर्डक हे अवैधरित्या खासगी सावकारीचा व्यवसाय करत होते. तिघांकडे सावकारीसाठी आवश्यक असलेला सहकार विभागाचा परवाना नव्हता. याविषयी सिन्नर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप राठोड यांनी माहिती दिली.

हेही वाचा…वादळी पावसाने नाशिक जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

वर्षभरापूर्वी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असतांना सहकार विभागाचे अधिकारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. यामुळे या प्रकरणाच्या तपासास विलंब झाला. एक वर्षानंतर याविषयी गुन्हा दाखल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.