Chairman of Jawahar Medical Foundation Dr Bhaidas Patil passed away | Loksatta

जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांचे निधन

प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु होते.

जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांचे निधन
डॉ. भाईदास पाटील

उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य आणि येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील (८६) यांचे शनिवारी वृध्दापकाळाने निधन झाले. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधु तथा आमदार कुणाल पाटील यांचे काका होत. पार्थिवावर रविवारी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या मोराणे येथील एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा- आव्हानात्मक परिस्थितीप्रसंगी नेहमी मीच पुढे – सारथी विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

धुळ्यासह संपूर्ण खान्देशात वैद्यकीय क्षैत्रात डॉ. भाईदास पाटील यांचा नावलौकिक होता. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु होते. १९६३ मध्ये एम.बी.बी.एस. झाल्यानंतर १९७२ मध्ये एफ.आर.सी.एस. पदवी त्यांनी प्राप्त केली होती. डॉ.पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निष्णात डॉक्टर घडविण्याचे काम केले. उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात भवितव्य घडविता यावे म्हणून त्यांनी बंधु माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या सहकार्याने जवाहर फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय, दंत, परिचारिका महाविद्यालय सुरु केले. धुळ्यातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

हेही वाचा- आव्हानात्मक परिस्थितीप्रसंगी नेहमी मीच पुढे – सारथी विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

डॉ.भाईदास पाटील यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (पाटील बंधू हॉस्पीटल, गल्ली नं.४, धुळे) निघणार आहे. सकाळी नऊ ते ११ या वेळेत मोराणे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पाताई पाटील, मुलगा नेहल, सून संगिता, मुलगी डॉ. ममता पाटील आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-10-2022 at 21:22 IST
Next Story
नाशिक म्युनिसिपल कर्मचारी सेना कार्यालयाचा वाद चिघळला; ठाकरे गटाने अनधिकृतपणे प्रवेश केल्याची शिंदे गटाची तक्रार