कांदा, द्राक्ष पीक तसेच भाजीपाल्यास योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील १०१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणासाठी परवानगी देण्याची मागणी पत्राव्दारे केली आहे. जिल्ह्यातील चांदवड तालुका हा कांदा आणि द्राक्ष पीक घेणारा प्रमुख तालुका आहे.

हेही वाचा >>> नाशिक : न जमिनींसाठी माकपचा नाशिक-मुंबई मोर्चा काढण्याचा इशारा

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ
Senior Citizens Act
सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

केंद्र आणि राज्य सरकार कांदा, द्राक्ष तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास असमर्थ ठरत आहेत. अत्यल्प भावामुळे शेतीमालाचा उत्पन्न खर्चही निघत नाही. हा खर्च भरून निघावा यासाठी कर्ज काढावे लागत असल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकऱ्यांना कुटूंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले आहे. शेतकरी वर्गाला प्राणत्याग केल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती राज्य व केंद्र सरकारने निर्माण केली असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.