महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने शहरातील आणि शहराबाहेरील अपंग प्रवाश्यांसाठी अनुक्रमे मोफत आणि सवलतीत प्रवासाची योजना आखण्यात आली. यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड घेणाऱ्या अपंग प्रवाश्यांना मोफत तर कार्ड नसलेल्या सर्व अपंग प्रवाश्यांना ७५ टक्के सवलतीत प्रवास करता येईल. मोफत प्रवास करणाऱ्यांना शून्य आणि सवलतीत प्रवास करणाऱ्यांना एक चतुर्थांश मूल्याचे तिकीट काढणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित प्रवासी विनातिकीट धरून कारवाई केली जाईल. सवलतीत प्रवास करणाऱ्यांना तिकीट काढावेच लागणार आहे. पण मोफत प्रवासाचे कार्ड देऊन तिकीट काढणे अनिवार्य करण्यातून प्रशासन नेमके काय साधणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा – छगन भुजबळ यांचा सल्ला

dombivli shilphata road marathi news, shasan aplya dari dombivli marathi news
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
pune mahametro marathi news, metro station name change pune marathi news
पुणे मेट्रोच्या स्थानकांचे आता नामांतर! जाणून घ्या कोणत्या स्थानकांची नावे बदलणार…
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
thane central park marathi news, thane kolshet marathi news, thane traffic jam at kolshet area marathi news
ठाणे : सेंट्रल पार्कमुळे कोंडीचे नवे केंद्र कोलशेत

सिटीलिंक प्रशासनाने शहरात राहणार्या अपंग प्रवाश्यांसाठी मोफत प्रवासाची योजना तयार केली आहे त्या अंतर्गत आवश्यक ती कागदपत्रे देऊन कार्ड वितरित केली जात आहेत. या योजनेचा शहराच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या अपंग प्रवाश्यांना लाभ मिळत नव्हता. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन मोफत प्रवासाचे कार्ड नसलेल्या शहर वा शहराच्या हद्दीबाहेरील सर्व अपंग प्रवाशांना सिटीलिंकमधून प्रवास करताना पूर्वीप्रमाणे तिकिटात ७५ टक्के सवलत देण्याचे निश्चित केले आहे. एक डिसेंबर म्हणजे गुरूवारपासून या नव्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. परंतु, अपंग प्रवाशांना आधारकार्ड आणि शासनाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रवासावेळी सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. तसेच अपंगत्व हे ६५ टक्केपेक्षा जास्त असल्यास अश्या प्रवाश्यासोबत असलेल्या सहकारी प्रवाशास देखील तिकीटामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे.

हेही वाचा >>>सीमा वादात कर्नाटकी कावा लक्षात घ्या; छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला

सिटीलिंक मार्फत मोफत कार्ड दिलेल्या अपंग प्रवाशांना प्रवास करतेवेळी वाहकाकडुन शून्य मूल्याचे तिकीट घेणे अनिवार्य असणार आहे. असे तिकीट न घेतल्यास संबंधित अपंग प्रवासी विनातिकीट प्रवासी समजून कारवाई करण्यात येईल, असे सिटीलिंक प्रशासनाने सूचित केले आहे. सवलतीत प्रवास करणाऱ्यांना तिकीट काढावेच लागणार आहे. मात्र, कार्डद्वारे मोफत प्रवासाची सुविधा देऊनही प्रशासनाकडून शून्य मूल्याच्या तिकीटाचा आग्रह का धरण्यात येत आहे, हे अपंग प्रवाश्यांना कळेनासे झाले आहे. ६५ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व कार्डधारकासोबत असलेल्या सहप्रवाशासही तिकीटात निम्म्याने सवलत देण्याच्या निर्णयाचे अपंग प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.