‘सिटीलिंक’कडून आता रविवारीही पास वितरण

महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेत विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या शहरातील चार पास वितरण केंद्रांचे कामकाज आता रविवारीही सुरू राहणार आहे.

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेत विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या शहरातील चार पास वितरण केंद्रांचे कामकाज आता रविवारीही सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी २८ नोव्हेंबरपासून रविवारी सुट्टीच्या दिवशीही पास वितरित हा निर्णय घेण्यात आला. 

महानगर परिवहन महामंडळाने पास वितरणासाठी तपोवन आगार आणि सिटीलिंक कार्यालय, नाशिकरोड तसेच पंचवटी येथील विभागीय कार्यालयात केंद्र सुरू केली आहेत. या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शनिवार चालत होते. आता रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू राहणार आहेत. विद्यार्थी पास सुविधा ही ऑनलाइनही उपलब्ध आहे. तपोवन आगारातील व सिटीिलक कार्यालयातील केंद्रे आता सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत, तर पंचवटी आणि नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयातील केंद्रे ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यान्वित असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Citylink distributes sundays ysh

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ
ताज्या बातम्या