वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती; केंद्रापर्यंत जाऊन अनेक जण परत

देवळा: देशात आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना करोना लशीची वर्धक (तिसरी) मात्रा देण्यात येत आहे; परंतु अनेक आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी सक्ती केल्याने लस न घेताच त्यांना परतावे लागले. ज्येष्ठांना वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती न करता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणी करून लसीकरण करावे, अशी मागणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केली आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि इतर आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने वर्धक मात्रा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले आहे. त्यामुळे मात्रा देण्यात येणाऱ्या ठिकाणी सर्व साठी उलटलेल्या नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी झाल्याने अनेकांना लशीसाठी आपल्या खासगी डॉक्टरांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी धाव घ्यावी लागली. वर्धक मात्रा घेण्यास जाणाऱ्या नागरिकांना करोना लशीची दुसरी मात्रा नऊ महिन्यांपूर्वी घेतली असेल तर ते तिसऱ्या मात्रेसाठी पात्र ठरणार आहेत; परंतु पात्र असूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांना मंगळवारी लस मिळाली नसल्याने माघारी परतावे लागले.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Regional Transport Authority application
तब्बल दीड हजार दिवसांचा उशीर! ग्राहक आयोगाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना…
Opportunities for the unemployed Recruitment for more than 20 thousand vacancies
बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच वर्धक मात्रा घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने झालेल्या सर्वानाच सरसकट वर्धक मात्र द्यावी, अन्यथा स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी ज्येष्ठांना वैद्यकीय प्रमाणपत्र देत शिफारस करावी, ज्येष्ठ नागरिकांची होणारी हेळसांड थांबवत वर्धक मात्रा द्यावी, अशी मागणी देवळा डॉक्टर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मविप्र संचालक डॉ. निकम यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आरोग्य मंत्रालयाने तिसरी मात्रा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे  म्हटले असल्याने मंगळवारी लसीकरण ठिकाणी आमच्याकडून आमचा ज्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहे, त्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र मागितले. त्यामुळे लसीसोबतच प्रमाणपत्रासाठीदेखील हेलपाटे मारावे लागत आहेत.

– भिका शेवाळे (खामखेडा)

आरोग्य विभागाच्या पत्रात आम्हाला इतर आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने तिसरी मात्रा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची मागणी करत आहोत.

– सुधीर पाटील (तालुका वैद्यकीय अधिकारी, देवळा)