लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: तक्रारदाराच्या वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान मिळण्यासाठी चांदवड पंचायत समितीकडे प्रकरण केले होते. हे प्रकरण मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी करुन त्यापैकी चार हजार रुपये स्विकारताना कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

आणखी वाचा- वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात ५६२ हेक्टर पीक नुकसान- कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

अनुदान प्रकरण मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी नामदेव शिंदे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सापळ्यादरम्यान तक्रारदाराकडे शिंदेने पाच हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती चार हजार रुपये शुक्रवारी स्विकारले. यावेळी पथकाने शिंदे यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contract assistant officer caught accepting bribe mrj
First published on: 19-03-2023 at 12:03 IST