लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या अन्य उमेदवाराने अर्ज दाखल करू नये, माघार घ्यावी, यासाठी दबावतंत्राचा अवलंब करीत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घडली. यावेळी शिवसेना शिंदे गट-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात घोषणाबाजी केली. या निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.

Parinay Phuke, Legislative Council,
भविष्यातील मतभेद टाळण्यासाठीच परिणय फुकेंना विधानपरिषदेची उमेदवारी!
narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Shivsena, claim, Murbad Constituency,
शिवसेनेचा मुरबाड मतदारसंघावर दावा, वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारीसाठी वरिष्ठांकडे साकडे
Krupal Tumane, Krupal Tumane latest news,
लोकसभेची उमेदवारी नाकारलेल्या तुमाने, भावना गवळींचे पुनर्वसन
Pankaja Munde maharashtra legislative councile
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
Controversy in Nashik Teacher Constituency election due to distribution of money outside the Centre
केंद्रापर्यंत प्रलोभने अन् मतदानासाठी रांगा; केंद्राबाहेर पैसे वाटपाने नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वादात
Nashik Teachers Constituency,
नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात
Nashik Teachers Constituency, Nashik Teachers Constituency Voter List Under Re Verification, Teachers Constituency voter list under reverification, Allegations of Inclusion of Non Teaching Staff, nashik news,
आरोपांमुळे नाशिक शिक्षक मतदार याद्यांची फेरपडताळणी

शिक्षक मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. याच दिवशी महायुतीत जागा वाटपाचा घोळ मिटला. शिवसेना शिंदे गट ही जागा लढविणार असल्याचे निश्चित झाले. गतवेळचे शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेच्या एबी अर्जासह पुन्हा अर्ज दाखल केला. या जागेवर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार दराडे आणि ठाकरे गटाचे उमेदवार अॅड संदीप गुळवे यांच्यात लढत होणार आहे. शिंदे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणारे कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केल्यावरून उपरोक्त वाद झाला.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाव साधर्म्य व काहिशा समान चिन्हामुळे अपक्ष उमेदवार बाबू भगरेंनी एक लाखहून अधिक मते मिळवली होती. त्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांना बसला. त्यांचे मताधिक्य घटले.

हेही वाचा >>>आंध्र प्रदेश, तामिळनाडुच्या चोरांकडून २२ भ्रमणध्वनी जप्त; नाशिक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

शिक्षक मतदारसंघात तसेच डावपेच आखले जात असल्याचे पाहून आ. किशोर दराडे यांच्यासह समर्थकांनी दबावतंत्राचा प्रयोग केल्याचे सांगितले जाते. आपण अर्ज दाखल करू नये, यासाठी दबाव टाकून धक्काबुक्की केल्याचे राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी माध्यमांना सांगितले. आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात हा गोंधळ झाला. पोलिसांना धाव घ्यावी लागली. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी उपरोक्त घटनेशी आपला व कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला.