उड्डाणपूल, अ‍ॅडव्हेंचर पार्क, लॉजिस्टक पार्कसाठी तरतूद; अंदाजपत्रकात स्थायीकडून २५० कोटींनी वाढ

नाशिक : पेठ रोड आणि  दिंडोरी रस्त्यावर उड्डाण पूल, लॉजिस्टिक  पार्कसाठी भूसंपादन, अ‍ॅडव्हेंचर पार्क आदी कामांसाठी तरतूद करीत स्थायी समितीने महानगरपालिकेच्या २०२२-२३ वर्षांच्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकात २५० कोटींनी वाढ करीत ते अडीच हजार कोटींवर नेले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजप नव्या योजनांमधून प्रचाराची संधी साधणार आहे. स्थायीने मंजूर केलेले अंदाजपत्रक लवकरच सर्वसाधारण सभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
SME, small and medium enterprises, initial public offerings, ipo, Raise, Rs 5579 Crore, Current Financial Year, Investors Profit, finance, financial knowledge, finance year end,
‘एसएमई आयपीओं’च्या मंचावर विक्रमी ५,५७९ कोटींची निधी उभारणी
virar bolinj mhada
दीड हजार कोटीची ५,१९४ घरे विक्रीविना, विरारबोळींजमधील घरांसाठी म्हाडाची कसरत सुरूच

आचारसंहिता लागू होण्याआधी अंदाजपत्रकाचा विषय मार्गी लावण्याचे नियोजन आहे. त्या अंतर्गत दोन आठवडय़ांपूर्वी मनपा आयुक्तांनी २०२२-२३ वर्षांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन अंदाजपत्रकास दुरुस्तीसह मंजुरी दिल्याचे तेव्हाच स्थायी सभापती गणेश गिते यांनी जाहीर केले होते. आयुक्तांचे कुठलीही करवाढ नसणारे २२२७.०५ कोटींचे अंदाजपत्रक आहे. स्थायी समितीकडून यात सुमारे २५० कोटींनी वाढ केली गेली. करोनामुळे घटलेले उत्पन्न व दायित्व यामुळे नव्या भांडवली कामांसाठी फारसा निधी राहणार नसल्याचे आयुक्तांच्या निवेदनातून स्पष्ट झाले होते. तथापि, सदस्यांना नव्या योजनांचा सोस काही आवरला जात नसल्याचा आजवरचा अनुभव आहे.

निवडणूक वर्षांत यात वाढ झाल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी गृहीत धरलेल्या उत्पन्नात भरीव वाढ होईल, असा स्थायी समितीचा अंदाज आहे. त्यामुळेच २०२२-२३ वर्षांत जाहिरात कर, मनपाचे भूखंड  बीओटी तत्वावर विकसित करणे, अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक अधिमूल्य, अनधिकृत बांधकाम तडजोड शुल्क यातून एकूण ७४७.२० कोटी रुपये जमा होतील, असे स्थायी समितीने गृहीत धरले. पालिका आयुक्तांनी हे उत्पन्न ४०७.२३ कोटी गृहीत धरलेले आहे. स्थायी समितीने प्रभाग विकास निधी व स्वेच्छा निधीत वाढ केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लॉजिस्टक पार्क उभारण्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. या पार्कसाठी मनपा जागा उपलब्ध करणार आहे. त्या भूसंपादनासाठी स्थायीने ८० कोटींची तरतूद केली. स्थायी समितीकडून हे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत मांडले जाणार आहे.

पेठ रोड आणि दिंडोरी रस्त्यावर उड्डाणपूल

याआधी मंजूर झालेल्या दोन उड्डाण पुलांचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना पेठ रोड आणि दिंडोरी रस्त्यावर नव्या दोन उड्डाण पुलांसाठी तरतूद करण्यात आली. या शिवाय मनोरंजनासाठी अ‍ॅडव्हेंचर पार्कची घोषणा करण्यात आली.