लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जेलरोड परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावूनही ही शाळा अनधिकृतपणे चालवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली. नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेची एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या शाळेला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस शिक्षण विभागाने बजावली होती.

हेही वाचा… नाशिक: सप्तश्रृंगी मंदिरात वस्त्रसंहितेविषयी विश्वस्त-ग्रामस्थ यांच्यात चर्चा

तथापि, संस्था चालकांनी शाळा बंद न करता ती अनधिकृतपणे सुरू ठेवली. यात शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्या विरोधात बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमान्वये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against institution managers in case of unauthorized school in nashik dvr
First published on: 29-05-2023 at 12:43 IST