लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: मध्य प्रदेशातील विविध भागातून चोरुन आणलेल्या दुचाकी कमी किमतीत विकणार्‍या तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर येथे मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अजय पावरा (२७, रा. वकवड, ता. शिरपूर, धुळे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. अजय हा मित्रांसह त्याच्या नातलगांना कमी किमतीत दुचाकी विकत असल्याची, तसेच त्याने अमळनेरमधूनही दुचाकी लांबविल्या असून, तो त्या नाशिक येथे विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार रवी नरवाडे, हवालदार राजेश मेंढे यांसह इतर कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करीत सूचना दिल्या.

आणखी वाचा- भिंतीखाली दबून तीन कामगारांचा मृत्यू, चाळीसगावात गटार बांधकाम करताना दुर्घटना

अमळनेरमध्ये संशयास्पद फिरत असलेल्या अजयच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पथकाने पोलिसी खाक्या दाखविताच तो बोलता झाला. त्याने मध्य प्रदेशसह अमळनेरमधून लांबविलेल्या १४ दुचाकी काढून दिल्या. त्यातील बहुतांश दुचाकी मध्य प्रदेशातील विविध भागांतून चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. यात सर्वाधिक दुचाकी एचएफ डीलक्स आहेत. अजय याला पुढील कारवाईसाठी अमळनेर येथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime branch arrested two wheeler thieves in 14 vehicles seized mrj
First published on: 20-03-2023 at 16:41 IST