लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – धरणे तुडूंब भरलेली असताना महानगरपालिकेच्या वितरण प्रणालीतील गोंधळामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिन्या व प्रणालीतील दोष आधी युद्ध पातळीवर दूर करावेत, जलकुंभ किती प्रमाणात भरले जातात, पाणी कसे सोडले जाते, याची पडताळणी करुन पाणी पुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तोपर्यंत नागरिकांना सल्ले देऊ नयेत, असे टिकास्त्र भाजप आमदारांनी मनपा प्रशासनावर सोडले आहे.

पाणी पुरवठ्यासह अन्य विषयांवरून मागील आठवड्यात भाजपच्या आमदारांनी मनपा आयुक्तांना धारेवर धरले होते. हे प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आयुक्तांना खुर्चीवर बसू दिले जाणार नसल्याचा इशारा दिला होता. यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी विविध जलकुंभाना भेटी देऊन आढावा घेतला. पाणी पुरवठ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. पाणी पुरवठ्याबाबत होणाऱ्या तक्रारींविषयी पाणी पुरवठा विभागाने बहुतांश ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होत असल्याचा दावा केला आहे. अनेक तक्रारी या जास्त दाबाने व वरील मजल्यावर पाणी पुरवठा होण्याशी संबंधित आहेत. काही इमारतीत सदनिकांची संख्या आणि नळ जोडणीचे आकारमान यात तफावत होती. यातील ज्यांनी सुधारित आकारमानाच्या नळ जोडणी घेतल्या, त्या इमारतीतील तक्रारींचे निराकरण झाल्याचे या विभागाने म्हटले आहे.

Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
mla sunil prabhu complaint to bmc commissioner over defective water pump
पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
nashik goon killed by six marathi news
नाशिक: पूर्ववैमनस्यातून गुंडाची हत्या, सहा जण ताब्यात
controversy regarding Siddesh Kadam Mercedes visit Inconsistencies in Maharashtra Pollution Board claims pune print news
सिद्धेश कदम यांच्या मर्सिडीज भेटीचे गौडबंगाल! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या दाव्यात विसंगती; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन
urban development department approved mega housing project in Panvels
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या महागृहनिर्माणाला गती 
Spraying of pesticides with drones marathi news
कुतूहल : पाहा, निवडा, फवारा!

हेही वाचा >>>गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

प्रशासनाच्या दाव्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी धरणे भरलेली असल्याने खरेतर टंचाईचा प्रश्न उद्भवयास नको, असे सांगितले. मनपाच्या वितरण व्यवस्थेतील गोंधळामुळे् कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा ठपका ठेवला. वितरण व्यवस्थेतील त्रुटी, गळती, खराब वाहिन्या बदलणे आदी कामे तातडीने करण्याची आवश्यकता आहे. शहरातील जलकुंभ कसे भरतात, त्यातून किती पाणी सोडले जाते याचे अवलोकन करावे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तिथे नवीन आकारमानाच्या जोडण्या देता येतील. सणोत्सवात पाण्याअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये. महापालिकेने प्रथम आपल्या व्यवस्थेतील दोष पूर्णपणे दूर करावेत, तोवर सल्ले देऊ नये, असे फरांदे यांनी सुनावले.

आमदार सिमा हिरे यांनीही पाणी पुरवठा व्यवस्थेत फारसा फरक पडलेला नसल्याचे नमूद केले. योग्य नियोजन केल्यास कुठेही पाण्याचा तुटवडा होऊ शकत नाही. सिडकोत मध्यंतरी रात्री तीन, चार वाजता पाणी पुरवठा होत असे. महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. मनपाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला असला तरी त्यासाठी प्रथम सुरळीत पाणी पुरवठा व्हायला हवा. ठेकेदारामार्फत भरलेल्या व्हॉल्वमनला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. स्थानिक राजकीय मंडळींच्या प्रभावाखाली न येता व्हॉल्व्हमनने प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक असल्याकडे हिरे यांनी लक्ष वेधले. आमदार राहुल ढिकले यांनी काही ठिकाणे वगळता, अन्यत्र महापालिकेला सुधारणा करण्याची गरज असल्याचे सूचित केले.

हेही वाचा >>>नाफेडकडून कांदा खरेदी व्यवहारांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत पडताळणी

महापालिकेचे दावे

पाणी पुरवठ्याच्या वेळेत केलेल्या पाहणीत बहुतेक भागात पाणी पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होत असूनही नागरिकांच्या तक्रारी व मागणी ही जास्त दाबाने व वरच्या मजल्यावर पाणी पुरवठा न होण्यासंदर्भात असल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्यासह विविध सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिका जमिनीखाली टाकीत किंवा तळ मजल्यापर्यंतच पाणी पुरवठा करण्यास बांधील आहे. वरील मजल्यावर थेट पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारींचा विचार होणार नाही. इमारतीतील सदनिकेच्या संख्येच्या प्रमाणात तांत्रिकदृष्ट्या योग्य आकारमानाची नळ जोडणी घेणे क्रमप्राप्त आहे. पाणी पुरवठ्याशी संबंधित तक्रारींसा्ठी नागरिकांनी नाशिक पूर्व ९९२२४४७०३०, ०२५३-२५९७९८२ ९४२२७५०२६५, नाशिक पश्चिम ८८३०४९००९२, ०२५३ – २५८२३४८, ९४२२२ ६७१९३, पंचवटी ०२५३-२५१३४९०, ९८९०६ ४६०३६, नाशिकरोड ९९७०९६९८९४, ०२५३ – २४६०२३४, ९४२३९ ६५३१३, नवीन नाशिक ७२७६८२२६७६, ०२५३- २३९०७६८, ९४२३१ ७९१८१ आणि सातपूर विभागात ९३७३५ ९०७७५, ०२५३-२३५०३६७, ७७९८९१५३३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.