जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात देशी, विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यंदा पक्ष्यांची गर्दी अभयारण्यात नसून गाळपेरा भागात होत आहे. गाळपेरा भागात पक्ष्यांना मुबलक स्वरूपात खाद्य उपलब्ध आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक दरवर्षी येत असतांना यंदा मात्र स्थानिकांसह अन्य पर्यटकांनी वनविभागाच्या चालढकल वृत्तीमुळे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: २५ टन लोखंडासह मालमोटारीची चोरी

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
Water scarcity in Jalgaon district
निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचे संकट; ३१ गावांना ३५ टँकरद्वारे पाणी

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात वर्षभर पक्ष्यांचा किलबिलाट कायम असतो. अभयारण्यात पाणी, झाडे मुबलक प्रमाणात असल्याने स्थानिक पक्ष्यांसह अन्य देशी, विदेशी पक्षी या ठिकाणी थांबतात. यंदा वर्षभर अधुनमधून पाऊस पडत राहिल्याने अभयारण्यात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. मधल्या काळात अभयारण्यात असलेल्या धरण परिसरातील टायफा वनस्पती काढण्यात आली. याचाही परिणाम पक्ष्यांच्या उपस्थितीवर झाला आहे. गाळपेरा भागात पाणी, पाण्यातील अन्य खाद्य मुबलक प्रमाणात असल्याने पक्ष्यांनी आपला मुक्काम अभयारण्यापेक्षा गाळपेरा भागात हलवला आहे. या ठिकाणी रंगीत करकोचासह अन्य तीन हजारांहून अधिक पक्षी आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक, निसर्गप्रेमी या ठिकाणी येत असतात. अनेक पक्षीप्रेमी पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी येतात. पक्ष्यांच्या संख्येनुसार पर्यटकांची संख्याही दिवसागणिक वाढत जाते. यंदा मात्र तसे चित्र दिसत नाही.

हेही वाचा >>>नाशिक: कार्डधारित अपंगांना प्रवास मोफत पण, तिकीट काढणे बंधनकारक; सिटीलिंक प्रशासनाचा निर्णय

वन विभागाकडून अभयारण्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यात येत नाहीत. अभयारण्यात काम सुरू असतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जोडणी तुटली आहे. ज्येष्ठांना अभयारण्यातील एका खोलीत पक्षी पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जोडणी तुटल्याने ही सुविधा सध्या बंदच आहे. मनोरे डळमळीत झाले असून ते कधीही पडू शकतील, अशी स्थिती आहे. अभयारण्यापर्यत येणारे रस्ते खराब आहेत. याशिवाय पर्यटकांना माहिती देण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी नसतात. स्थानिक मार्गदर्शकावर सारी भिस्त आहे. वनविभागाकडून कुठल्याच सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: रोहित पवार यांनी अभ्यास करावा – छगन भुजबळ यांचा सल्ला

रामसरचा उल्लेख नाही
नांदुर मध्यमेश्वर अभयारण्य परिसराला जागतिक स्तरावर रामसरचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु, याविषयी नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात कुठेही त्यासंदर्भात फलक लावण्यात आलेला नाही. आजही या अनुषंगाने अभयारण्यात कुठल्याच सुविधा उपलब्ध नाहीत. बाहेरगावहून येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील जैवविविधतेची माहिती देण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. याविषयी पर्यटकांसह, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.