सिन्नर तालुक्यात परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान

शेतातील मातीसह लागवड केलेला कांदा रोपेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सिन्नर तालुक्यात पावसाने शेतातील कांदा पीक वाहून गेले.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील देशवंडी, जायगाव, सोनगिरी आदी गावात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. देशवंडी येथील काही भागात अतिवृष्टी झाली. यात नुकत्याच लागवड केलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले.

पावसाच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात आधीच पिकांचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही त्यास अपवाद राहिला नाही. रविवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाने शेतातील पिके होत्याची नव्हती झाली.

शेतातील मातीसह लागवड केलेला कांदा रोपेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पिकाच्या नुकसानीचे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा शेतीची दिघोळे यांनी सोमवारी पाहणी केली. चिंधु राडोमाडे यांचे ठीबक सिंचन पध्दतीने लावले कांदेही वाहून गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Damage of onions due to unseasonal rainfall in sinnar taluka zws

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या