त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळूंजे शिवारातील वन विभागात मंगळवारी अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे उघड झाले. दुपारी ऊन आणि जोराची हवा असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी वनमजुरांना खूप कष्ट घावे लागले. या आगीत काही जुनी झाडे आणि या वर्षी लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान झाले.

हेही वाचा- नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले, मालेगाव, गणेशगाव, धुमोडी या परिसरात ही आग लागली. मागील वर्षीही या भागातील जंगलात आग लागली होती. जिल्ह्यात मागील वर्षी २२ ठिकाणी वणवे लागले होते. काही ठिकाणी जंगलात लागणाऱ्या आगीला मानवी कृत्य जबाबदार असल्याचेही उघड झाले आहे. आगीत कित्येक पक्षी, त्यांची घरटी, अंडी, अन्नाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याचा हा पश्चिम भाग विविध वृक्षांनी भरलेला आहे. या जंगलात अनेक वनौषधी आहेत. त्यातील बहुतांश दुर्मिळ आहेत. हा जंगल परिसर, सृष्टीसौंदर्य जपण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागातील जंगलात नेहमी वणवे लावले जातात, अशा आडमार्गाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही लोक तो जाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे कृत्य वणव्यात रूपांतरीत होण्यासाठी पुरेसे ठरते.

हेही वाचा- “बंडखोरांच्या पाठिशी उभं राहणार नाही” या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर सत्यजीत तांबेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

यामुळे वन विभागात काही उपाय करणे गरजेचे झाले आहे. वन विभागातील एखाद्या रस्त्याने एखादी व्यक्ती जात असेल तर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. या विषयासंदर्भात गाव पातळीवर ग्रामपंचायत तसेच वन विभागाकडून प्रबोधनासह प्रत्यक्ष कृती आणि संशयितांविरुध्द सज्जड कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. त्र्यंबक-हरसूल या मुख्य रस्त्यालगत खरवळ, कोहली फाटा, वेळूंजे या ठिकाणी तपासणी नाका होणे गरजेचे आहे. यामुळे येथील आडमार्गाने होणारी झाडांची चोरटी वाहतूक, अन्य तस्करी रोखण्यासाठी मदत होऊ शकेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.