scorecardresearch

राणेनगरातील धोकादायक जलकुंभाचे पाडकाम

राणेनगर भागातील सेंट फ्रान्सिस शाळेलगत ४० ते ४५ वर्षांपूर्वी बांधलेल्या धोकादायक जलकुंभाचे पाडकाम महापालिकेने सुरु केले आहे.

राणेनगर परिसरातील धोकादायक जलकुंभ जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पाणी पुरवठय़ावर परिणाम होणार नसल्याचा दावा

नाशिक : राणेनगर भागातील सेंट फ्रान्सिस शाळेलगत ४० ते ४५ वर्षांपूर्वी बांधलेल्या धोकादायक जलकुंभाचे पाडकाम महापालिकेने सुरु केले आहे. जुना, कमकुवत जलकुंभ पाडून त्याच जागी नवीन २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या कामामुळे राणेनगर आणि चेतना नगर परिसरातील पाणी पुरवठय़ावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

पाथर्डी फाटा ते राणेनगर, चेतनानगर परिसरात अनेकदा पाणी पुरवठय़ाविषयी तक्रारी होत्या. मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागातील सेंट फ्रान्सिस शाळेजवळच्या जुन्या जलकुंभातून आसपासच्या भागात पाणी पुरवठा केला जात होता. नगरपालिकेच्या काळात त्याची उभारणी झाल्याचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता गोकूळ पगारे यांनी सांगितले.

जुन्या जलकुंभाशेजारी नंतर आणखी एक जलकुंभ उभारला गेला. जुन्या जलकुंभाच्या खांबांना तडे गेले होते. टाकीतून मोठय़ा प्रमाणात गळती सुरू होती. जिन्याची अवस्था बिकट झाली होती. तपासणीत जुना जलकुंभ कधीही कोसळू शकतो, असा अहवाल स्थापत्य अभियंत्याकडून आला होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी त्याचा वापर थांबवून परिसरातील पाणी पुरवठय़ासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे पगारे म्हणाले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dangerous water hyacinth school work ysh

ताज्या बातम्या