scorecardresearch

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत

गीत प्रसारणप्रसंगी पाटील यांच्यासह बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, गीताची निर्मिती करणारे पुण्याच्या प्रभारंग फिल्म्सचे संचालक संदिप माने, ऊर्मिला चोपडा-हिरवे, शरद डहाळे आदींची उपस्थिती होती.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी स्फूर्तिगीत

जळगाव : मुंबई येथील बीकेसी मैदानावर बुधवारी होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना स्फूर्तिगीत तयार करण्यात आले आहे. मंगळवारी हे गीत मुंबई येथील कार्यक्रमात सर्वांसाठी प्रसारित करण्यात आले. आम्ही शिवबाचे धारकरी… शिवसेनेचे मानकरी हे गीत म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकाने अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकेच नव्हे; तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचे वचन आहे, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गीताबद्दल भावना व्यक्त केली.

गीत प्रसारणप्रसंगी पाटील यांच्यासह बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे, गीताची निर्मिती करणारे पुण्याच्या प्रभारंग फिल्म्सचे संचालक संदिप माने, ऊर्मिला चोपडा-हिरवे, शरद डहाळे आदींची उपस्थिती होती.शिवसेनेचा धगधगता प्रवास हे या स्फूर्तिगीताचे प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असे अभिमानाने म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यांत आनंद असेल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल, असे पाटील यांनी सांगितले. आदर्श शिंदे यांनी हे या गाण्याचे गायक आहेत. प्रभारंग फिल्म्स्चे संचालक संदिप माने यांनी गुलाबराव पाटील यांनी या गीताची संकल्पना मांडल्याचे नमूद केले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या