scorecardresearch

धुळ्यात धनगर समाज महासंघाची निदर्शने

राज्य घटनेतील तरतूदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एस. टी.प्रवर्ग) दर्जा मिळाला असून त्या आरक्षणाची तातडीने अमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज महासंघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

dhangar samaj protest
धनगर समाजाला मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धुळे येथे निदर्शने करताना धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते (छाया- विजय चौधरी)

धुळे : राज्य घटनेतील तरतूदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एस. टी.प्रवर्ग) दर्जा मिळाला असून त्या आरक्षणाची तातडीने अमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज महासंघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, जिल्हा संघटक चुडामण पाटील, भगवान गर्दे, नगरसेवक अमोल मासुळे आदी सहभागी झाले होते. या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आले.

देशाच्या घटनेत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एस.टी.प्रवर्ग) दर्जा मिळाला आहे. परंतु, ७० वर्षे झाली तरी या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे धनगर समाजावर अन्याय होत असल्याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन समाजाला अनुसूचित जमातीचा (एस.टी.प्रवर्ग) दर्जा मिळावा म्हणून लढा देत आहे. राज्य सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एस.टी.प्रवर्ग) दर्जाची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार करावा. अधिवेशनात वटहूकुम काढावा, अशी मागणी सकल धनगर समाजाने केली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×