नाशिक – देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) आणि कैलास पुंडलिक देवरे (वय ५५, दोघे रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी देविदास ठाकरे आणि कैलास देवरे हे दोघे हिरो मोटारसायकलने दहिवडकडून देवळ्याच्या दिशेने येत होते. त्याच वेळी देवळ्याकडून दहिवडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अर्टिगा कारने पिंपळगाव (वा.) येथील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर अर्टिगा कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. धडक जोरदार असल्याने दुचाकीवरील देविदास ठाकरे आणि कैलास देवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी घटनेमुळे दहिवड परिसरासह देवळा तालुक्यात शोककळा पसरली आहे. या अपघातप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची तीव्रता
पिंपळगाव (वा.) येथील वळणावर झालेली धडक एवढी जोरदार होती की, मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. अर्टिगा कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. देवळा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे दहिवड परिसरासह देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
