शहरातील विविध समस्यांप्रश्नी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर वेळोवेळी आंदोलन करण्याची नामुष्की ओढावत असल्याचे वारंवार दिसून आले असून पोलीस मुख्यालय ते फाशी पूलपर्यंतच्या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवावे, या मागणीसाठी भाजपच्या माजी उपमहापौरांसह रहिवाशांनी खड्ड्यात उतरुन आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक : भाम नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा शोध सुरु

या आंदोलनात माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सतीश अंपळकर, भाजपचे महानगर जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सुहास अंपळकर आदी सहभागी झाले होते. धुळे मध्यवर्ती बस स्थानकाकडून पोलीस मुख्यालयाकडे जाणार्‍या आणि फाशी पुलावरील रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत.. या रस्त्यांवरून खड्ड्यांमुळे बस, रिक्षा यासह कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. या संदर्भात मनपा आयुक्तांना वेळोवेळी आणि गणपती उत्सव काळातही पत्र देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. परंतु, केवळ माती टाकून खड्डे बुजविण्यात आले. पावसामुळे ती माती वाहून गेली. पुन्हा परिस्थिती पूर्वासारखी झाली. रस्ता दुरुस्तीची मागणी करुन उपयोग होत नसून मनपा प्रशासन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर येत्या दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर आयुक्त दालनात शिरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी दिला आहे.

More Stories onधुळेDhule
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy mayor protest by going down in the pit for road repair amy
First published on: 07-10-2022 at 18:15 IST