नाशिक – आम्ही लाडकी बहीण योजना असो वा अन्य कुठल्याही योजनेत जातीभेद, धर्मभेद केलेला नाही. समाजातील सर्व घटकांपर्यंत योजना पोहचण्यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी आयोजित सभेत फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. विरोधकांनी अडीच वर्ष सत्तेत असताना कोणती भरीव कामे केली, ती सांगावीत, असे आव्हान त्यांनी दिले. मुलींचे शिक्षण, आरोग्य, लाडकी बहीण, महिलांना मोफत प्रवास, यासह वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती फडणवीस यांनी दिली. व्होट जिहादचा मुद्दा मांडताना त्यांनी लाव रे तो व्हिडिओ असे सांगत मुस्लीम धर्मगुरु नोवानी यांची चित्रफित दाखवली. व्होट जिहाद होत असेल तर मतांसाठी धर्मयुध्द व्हायला हवे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>पहिल्या दिवशी छातीत दुखू लागल्याने मुंबईत परतलेला गोविंदा दुसऱ्या दिवशी रोड शोसाठी पुन्हा हजर

दरम्यान, महायुतीच्या या सभेकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. महायुतीच्या देवळाली मतदार संघातील उमेदवार सरोज आहिरे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.

फडणवीसांच्या भाषणावेळी महिला उठण्यास सुरुवात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाडकी बहीम योजनेसह अन्य योजनांची माहिती देत असताना सभेत उपस्थित बहुसंख्य महिलांनी घरी जाण्यास सुरूवात केली. अवघ्या पाच मिनिटात मोठ्या प्रमाणावर खुर्च्या रिकाम्या झाल्याने फडणवीस यांनीही भाषण आटोपते घेतले.

हेही वाचा >>>नाशिक: सिडकोत पोलीस संचलन

…तर मालेगाव जिल्हा करणार

मालेगाव येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार वेळा विजयी झालेल्या दादा भुसे यांना यंदा दुप्पट मताधिक्याने निवडून दिल्यास मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Story img Loader