scorecardresearch

Premium

अवाजवी घरपट्टीने धुळेकर हैराण; भाजप उपमहापौरांचा घरचा आहेर

नागरीकांची लुटमार करण्याचा कार्यक्रमच मनपा प्रशासनाने सुरु केल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपचे उपमहापौर नागसेन बोरसे यांनी घरचा आहेर दिला आहे.

dhule municipal corporation taking excess property tax
धुळे महानगरपालिका

धुळे : शहरातील मालमत्ता धारकांना अवाजवी घरपट्टी लावण्यात आलेली आहे. सुधारीत दर लावण्याच्या नावाखाली आणि २०१५ मध्ये केलेल्या मालमत्ता करवाढ ठरावांचा वापर करुन नागरीकांची लुटमार करण्याचा कार्यक्रमच मनपा प्रशासनाने सुरु केल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपचे उपमहापौर नागसेन बोरसे यांनी घरचा आहेर दिला आहे. २०१५ आणि २०२२ मधील मनपा महासभेतील ठराव रद्द करुन बेसुमार करण्यात येणारी वसुली बंद करावी, अशी मागणी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा >>> जळगाव: सिलिंडर स्फोटात तीन घरांचे नुकसान; संसारोपयोगी साहित्य खाक

Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
court hammer
मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली ; उच्च न्यायालयाकडून सर्व याचिका निकाली
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा
What Supriya Sule Said?
“देवेंद्र फडणवीस यांनी घरं फोडण्यात आणि पक्ष फोडण्यात वेळ…”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

बोरसे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. शहरातील मालमत्ता धारकांना अवाजवी घरपट्टी लावण्यात येत आहे. २० फेब्रुवारी २०१५ रोजी महासभेतील ठरावानुसार एप्रिल २०१५ पासून करयोग्य मूल्यावर २६ टक्क्यावरुन ४१ टक्के आकारणी करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. सदस्यांनी चर्चाअंती त्या सभेत ३६ टक्के करवाढ करण्यास मान्यता देण्यात दिली होती. तो ठराव बेकायदेशीर असल्याचे बोरसे यांनी म्हटले आहे. २२ डिसेंबर २०२२ चा ठराव घसार्याबाबतचा होता. त्यामध्ये प्रशासनाने पाच डिसेंबरच्या घसारा मूल्याविषयी करण्यात आलेल्या टिपणीचा विचार न करता ती नामंजुर करुन नऊ डिसेंबर २०२२ रोजी नवीन टिपणी तयार करुन महासभेत ठेवण्यात आली. २२ डिसेंबर २०२२ च्या महासभेत कुठलीही चर्चा न होता घसारा रकमेच्या टक्केवारीत वाढ न करता सरसकट मंजुर करण्यात आली. ती बेकायदेशीर तसेच धुळे शहराच्या जनतेच्या आर्थिक हिताविरोधी होती. करवाढीनुसार सुखसुविधा महानगरपालिका नागरिकांना देताना दिसत नाही. त्यामुळे २२ डिसेंबर २०२२ रोजीचा ठराव रद्द करण्याची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी केली आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhule municipal corporation taking excess property tax for residents zws

First published on: 31-05-2023 at 15:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×