पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा विश्वास

वणी : घरातील कर्त्यां पुरुषाला काही कारणाने अपंगत्व आले तर संपूर्ण कुटुंबावर आघात होतो. अशा वेळी त्या कुटुंबाने धीर न सोडता कुटुंबप्रमुखाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे. त्याचे मनोबल वाढविल्यास त्याच्या अपंगत्वावर मात करता येऊ शकते, असा विश्वास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पालन करताना अपंगत्व आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव तथा कृतज्ञता सोहळा नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. अधिक्षक पाटील यांच्या हस्ते अपंग पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

‘आधी द्यावे लागते, मगच आपल्याला मिळते’ हा निसर्गाचा आणि व्यवहाराचा नियम आहे. हा नियम आपण वागणूकीत विसरतो. म्हणून आपल्याला जे हवे आहे, ते आधी दिले पाहिजे. प्रेम, विश्वास, मान सन्मान, कृतज्ञता असो, हे सर्व आधी दिल्यानेच मिळते, असे कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय धुर्जड यांनी सांगितले.

काही सन्मानार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. आमच्याकडेही कुणीतरी लक्ष दिले आणि आमचा सन्मान केला. आता आम्हाला आणखी मोठे योगदान देऊन सेवा करण्याची हिंमत मिळाली असे, सन्मानार्थीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

स्व. हरिभाऊ देवराम धुर्जड मेडिकल सोशल फाउंडेशन आणि सुदर्शन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, फाउंडेशनचे उपाध्यक्ष विलास धुर्जड, देवळाली कॅम्प राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ खताळे, शहर शिवसेना महिला संघटक श्रद्धा कोतवाल आदी उपस्थित होते.